Thursday, 15 March 2012

रख्स-ए-बिस्मिल

या शहरात,
इंद्रियांची भूमिका
विस्तारते क्षणोक्षणी.
देह शिणत नाही.
पण, जीव शिणतो नेमाने.

इथेही आहेत
वारुळांचे चक्रव्युह,
सनातन वेदनांचे
अमानुष पर्याय,
गिधाडं-प्रेतांच्या
बेगुमान वस्त्या,
सावलीला दिवस
आणि
करुणेला रात्र.

इथे
काळोखाच्या ओठांतून,
बर्फाळ प्रार्थनाही
वाहत जातात,
अवरोधाच्या उगमाकडे.
भळाभळा अस्तित्व सांडत
गर्दी जगत रहाते,
होकार नकारांमध्ये
अडकलेल्या
ऐतिहासिक आवृत्त्या...


इथल्या किंकाळीतच,
नग्न आत्म्याचा देह
वस्रांसकट जन्म घेतो.
भयमग्न आवेगात
देह नग्न होतो.
आत्मा वस्र घेतो...

या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
आणि मी असतो,
काळोख जगणारया शरीरात,
भूकेच्या टोलांवर,
जीवाला झोके देत.
सर्वांसह, स्वतःच्या
खुनाचे निर्विकार
कट रचत.

मनातल्या मनात मात्र,
पलिकडचे डोळे
खुणावून सांगतात,
'हे संदर्भ मिटले जावेत.
ही नियती पुसली जावी.
मौनाची रौद्र गाज
रक्तातून कानी यावी.
पैलु पाडलेल्या मुठींना
शुळांचे कोंभ फुटावे.
बंद देहाच्या अवयवांनी
दार मोकळे करावे.
माझाही व्हावा सर्वनाश
माझ्याशिवाय.'

तेव्हा शुभ्र शांततेच्या
एकांतात खुंट तोडुन,
बेहोष वेदनेत मी
सुगंध नाचवत नेईन,
क्षितिजाच्या पारावर
जिवंत होईल,
रख्स-ए-बिस्मिल!

Monday, 5 March 2012

Le Artiste

They act blind.
They believe wind.
and write their letters, with empty minds.
prose and verses,
some fearful curses.
a faithful empathy
by an cruel child.

why in the end
you always bend?
to juggle your trinity
in your tuxedo gent.
while writing p.s.
will you watch in mirrors?
while crying for lovers
have you lost your tears?
here i come folks.
here i come.
i talk to the stone
in my hands.
make my pain march
on beats of my heart.
my breath is nuisance
to your statue filled graves.

still for you folks,
i will roar like a lion.
i will jump like a monkey.
i will act beggar, monk, priest or just
you and me
even i will dress like a woman
and dance for you,
to quench your thirst.
with love and hate
I'll make you burst.
you will clap,
you will laugh.
'Le artiste! Le artiste!'
and throw bread and coins
maybe your sour fucked up minds
but I'll kick it ahead
'Am i an ARTIST? No, I'm just hungry.
Hungry to believe!'

Saturday, 3 March 2012

विराम

भर दुपारी
भुक लेऊन,
अस्ताव्यस्त
केसांनी,
धुरकटलेला
जीव घेऊन,
भारावलेले
क्षण चाळवीत,
तुझ्या दाराशी
छिनालपणे,
उभा जन्म
कोसळण्याची
वाट पाहत?

ते सर्व - २

सर्वांगी,
मौनाचे अधर.
मातीचा पदर.
व्याकूळ नदी
मेघाळलेली.
रेष प्रवाही
चुरगाळलेली.

आज तो येईल.
बाळस्पर्श देईल.
शरिरापलिकडले
स्पर्श ही घेईल.
वादळ ठेऊन,
निघून जाईल.

तो नसतो तेव्हा,
धुगधुगी असते.
पंखही असतात.
पण ओलेत्या
पावलांमधला
आक्रोश अडतो,
मावळतीच्या
घरामागे.

त्यांत,
गर्भपातासाठी विरामलेल्या,
प्राक्तनाच्या अनुयायांनी काढलेल्या,
हजारो
कावळ्या,
डुक्करं,
माश्यांच्या,
मिरवणुकीखाली
शिणतोय,
एक गल्लाभरु देह.