Tuesday, 28 August 2012

सेन्योरा एक्स

वास्तवाचा उत्सव साजरा करतानाच
दिवे जातात
तेव्हा जाता जाता दिसलेली
ब्लुजमध्ये थिरकणारी तुझी पाठ
अखंड पावसात वाहुन गेलेली पहाट
तुझ्या खिडकीकडुन वळणारे रस्ते
केसांत फिरणारे दगडी हात
छातीवरची जखम

तुझ्या बिछान्यात झोपणारी शिल्प
अढळपणाच्या दिप्तीने तुझ्या शरिरावर
सिगरेटचा धुर सोडणारे अल्टर इगोज
या सगळ्याचं मी काय करायचं?

उद्या एकांतात तुझ्या शरिरावरुन हात फिरवशील
तेव्हा माझा विचार करण्यापुरता
हा विचार झाकुन ठेव. बास