Saturday 24 September 2011

पैंजण



तिने पैंजण गहाण ठेवलेत.......
बये...तुझे नादमय अस्तित्व खोल कबरीत दडवलंय मी..वर दोन लिलीच्या फुलांसह...
फुले माझ्याच विधवेने ठेवलीत ना रचुन!
पुन्हा नकोय तुझी अल्वर मैफल! सिगरेट्चे अनौरस ढग थरारुन वहात जातात ना अनामिकात.....
पैजण गहाण ठेवलेस...राहु दे.
त्या पैजणांचा एकलकोंडा भातुकलीचा खेळ तुझ्या स्पर्शानेच श्वास घेऊ लागतो ना...मधुरा!
पैजण गहाण ठेवलेस तरी चालतील मला पण तुझे नाद्स्पर्श गहाण ठेऊ नकोस....

Friday 23 September 2011

Partial Existance

Fantasy land मधे जेव्हा भुकंप होतात...
तेव्हा तोकडया झग्यातली एक किरीस्ताव म्हातारी
माझ्या पायथ्याशी आशाळभुतपणे येऊन उभी रहाते....
माझ्यातलं काहीतरी काढुन नेते.....
काळ्या पिशवीत grams मधे ....
मी स्वताशीच हसतो...
आणि शिव्या वगळुन sonnets गात रहातो...
Macbeth च्या आवाजात....
जुन्या डायरीच्या आत दडवलेलं
गुलाबी symbolic असत्य
चोरट्या नजरेने उराशी कवटाळुन
मी fantacy land ची वाट धरतो...
वेशीपाशी दिसते अवजड विटांची भिंत...
त्यावर लटकलेली असंख्य घड्याळं.....
काळाला नागवु पहाणारी त्यांची स्थितप्रद्न्य निर्ल्लज्ज भुतावळ
वेड्या आशेने मी घेतॊही अंगावर ....
आधारासाठी चाचपडताना हाती लागतो संपलेला काळ....
छिन्न भिन्न अस्तित्व...
मी गमावलेलं आयुष्य जे
ash tray मध्ये ५-५ मिनिटांच्या तुकड्यात इतस्थतः विखरुन पडलयं...
मी तुकडे मोजु लागतो......
माझी टिकटिक वाढु लागते...
टिकटिक......टिकटिक.....!

Wednesday 7 September 2011

'..........' मधे असणे

शल्य राहु दे
रक्त वाहु दे
मला पाहु दे
आयुष्य.....

....................................

शरीरावर तीळ
तीळावर चरा
सौँदर्यसागरी
दुःखाचा झरा