Wednesday, 31 August 2011

एक bitchy कविता

log out होताना दिलेली शिवी
पावला पावलांनी आत आलीये
dated and sexist
painful but not yet fatal

भिरभिर सावलीसारखी अडकली
हाडांच्या सापळ्यात उगाचच
angel बनुन,आतले naked आभास:
त्यात त्यांची शाश्वत अडगळ

अडगळीतुन मेंदुच्या उडालेल्या
ठिकरया जमा केल्या तर
हातात काय पडेल? परमार्थ?

हाताला धरुन कामाठीपुरयाच्या
स्ट्रिटलाईटखाली उभं केलस मला...
लिपस्टिक लावुन गातोय
एक ancient ballad

फुलं होऊन माझ्या वर
पडता आहेत भेसुर नजरा
आणि बलात्कार करुन
तु मात्र सोज्वळ हसतेयस

Wednesday, 24 August 2011

हरवलेल्या गीतातले काहीसे....





(1)ती गेली उत्तररात्री
     नाही परतली पाऊले
     तिच्या श्वासांनी बांधले
     घर मागेच राहीले....


(2)उरातुनी माझ्या जळे
     एक चंदनाचा दिवा
     परतली नाही
     तिने धाडला सांगावा!

(3) ये असे जवळ ये पोरी
     नको अंधाराला थिजु
     कवितेच्या गावा जाऊन
     सावल्या फुलांच्या वेचु

(4)  पात्रात नदीच्या पुर
      पलिकडे अडकल्या गाई
      दग्ध ओंजळीतली साय
      काळ कशी हिरावुन नेई? 


Tuesday, 23 August 2011

तुटलेल्या मैत्रीणीस......


 Natalie,
        पावसाची हाक कानावर पडतेय.बाहेर अंधारुन आलंय. पण मला या अंधाराची तमा नाही. कारण अंधार हे एक संवेदनशील पण सुसंगत सत्य आहे, हे जाणतो मी. But the darkness could also be a myth! या दुसरया आभासाचे प्रयोजन मला काहि केल्या सापड्त नाहीये. तसेच, जर दंतकथंवरचे प्रारुप आवरण विलग करता आले,तर सत्य सापडेल? आणि अंधाराचे काय? एका मागुन एक प्रश्न ...हिवाळ्यातल्या पानगळीसारखे! पण आता अंधार चाचपण्यापुरतेही बळ शिल्लक नाही माझ्यात, कारण तु इथे नाहीस.
        दिवस आणि रात्र! या द्वयींचा अन्वयार्थ लावता येईलही कदाचित. परंतु संधिकालाचे काय? तो कसा काय थोपवुन धरणार? असे असले तरी प्रत्यक्षात संध्याकाळ मला उद्विग्न करुन सोडत नाही. उलट ती माझ्या स्रुजनाचा आणि आत्ममग्नतेचा कैवार घेते. म्हणुन संध्याकाळीच मी स्वःताला पाहु शकतो, तुझ्या नजरेने! अशावेळी माझ्या प्रेम,वासना आणि क्रौर्याचे सारे हुंकार ओंजळीत जमा होतात, आणि माझ्या सगळ्या अपेक्षां-उपेक्षांचे ओझे मीच भिरकावुन देतो. पण संधिकाल हा शेवटी आवेगी संभोगाच्या बंदिस्त काव्यासारखा...A twilight with a bliss! ही संध्या मला अजाणतेपणीच ओलांडुन नाहीशी होते, मात्र मागे ठेऊन जाते.....एक सम्रुदध पानगळ! ती काही केल्या थोपवता येत नाही मला. कारण नव्या अंकुराच्या हव्यासातुन मी स्वःताला मुक्त करु शकत नाही.
       असेच मागे एकदा तु मला Lennon  आणि त्याच्या पत्निचे 'Two Virgins'  नावाचे नग्न चित्र दाखवलेस. I said instantly,"Bloody insane...that must have made him a lot of money!" पण या अनभिद्न्य वाक्यानंतर मी ही काहीसा हादरलो.तुझ्या नजरेत माझ्या वांझपणाचा उदधार होता. Lennon समझायला मला हीच पानगळ सोसावी लागली. त्याचबरोबर ग्रेसच्या काही ओळी स्पर्शुन गेल्या....
'Teaching of the enlightened  Buddha embrace much.....but the one thing that is clear, worthy instructions does not contain what illustrious himself experienced!'    Lennonच्या खुनाने या ओळी अधिकच गडद झाल्या आहेत.
       मागे मला भेटायला आली होतीस तु....माझ्या मुलीबरोबर. तेव्हा तुझ्या एका हाताने तिचे मला निरखणारे कुतुहलाने ओथंबलेले डोळे झाकुन मोमीनच्या ओळी माझ्यावर भिरकावुन दिल्यास...
                                           'उम्र सारी कटी इश्क बितानेंमे मोमीन
                                        आखरी वक्त में क्या खांक मुसलमान होंगे?
                              SO  MY LOVE, she is your daughter by body but never be yours with soul!'
                  conspiracy!माझ्या स्वप्नांचा आणि कवितेचा असा अपभ्रंश? माझ्या अस्तित्वाच्या द्वैती प्रतिमांना आपल्या बाईपणाच्या भौतिकवादी संकल्पनांची चुड लावुन त्यांना सहज भेसुर केलंस तु. इथे माझा पुरुषार्थही मी पणाला लावु शकतो. पण माझ्या मुलीच्या प्राणलयीत मी पुरता अडकलो आहे ना.
 and Natalie तु माझ्यासारख्या देहाला चटावलेल्या आदिम जनावरची मादी नाहीस, तर... 'you have always been a myth for me,like a ancient biblical woman with her virginity underlined!' माझ्या प्रतारणा स्वःताच्या गळ्यात बांधुन तु, तुझ्या बाईपणाचा माझ्यावर सर्वतोपरी वर्षाव केलास. so it made my all poems look stupid without pain, without you!
          असेच एकदा जुन्या वह्या धुंडाळताना एक दंतकथा हाती लागली. Natalie ती तुला अर्पण,
mirza khan is a name of the great legendary poet who wrote with the name ghalib-the dominant and asad-the lion has been called a godless lover, who defied god in his own mighty words,

                                                "when there was nothing,there was god
                                                  if nothing had been,god would have been
                                                  my very being has been my downfall
                                                  if i hadn't been, what would it has mattered?"
                                                                                        
but such a legendary poet, once has been obsessed with just a small couplet of momin and offered him his entire life's work in exchange with these lines,
                                               तुम मेरे पास होते हो गोया
                                                जब कोइ दुसरा नही होता.                                   
या दंतकथेत पुढे काय झालं मला ठाऊक नाही पण या दोन ओळींचे वेगवेगळे निघणारे अर्थ...मला आजही कासाविस करुन सोडतात.
                     आत्ताच बाहेरचा पाऊस ऒसरलाय. Natalie तुझ्या आठवणींच्या पैंजणस्पर्शाने अम्रुतमय झालोय मी! तुझ्या नजरेतुन स्वःताला निरखताना, मला ''Two Virgins' मधल्या Lennon प्रमाणे नग्न झाल्यासारखे वाटतेय. अशातच माझ्या आभासी लाजेचा तोल सावरताना..माझ्या प्रतिमांचे धुके विरत चालले आहे...शेवटी उरलेली माझीच दोन निर्ल्लज्ज रुपे माझ्याभोवती फेर धरुन नाचता आहेत...त्या पडझडीही कानी पड्लेल्या माझ्या उगमसुत्रांची ही वैराण हाक.....

     'जोगियापुरुष आणि वेश्या .....धडपड आणि पडझड...शेवटी दोन्हीही सावलीच्याच कथा!'

                                                                                                    - हरवलेल्या जहाजाचा कप्तान

ग्रेस: एक संध्यामग्न वादळ


ग्रेसच्या या निर्मितीचा आस्वाद घेताना,त्यांच्या लिखाणाकडे फक्त एक गंभीर आणि वेगळं साहित्य म्हणुन निश्चितच पहाता येत नाही.या प्रश्नांच्या निर्मितीला कार्यकारणभावाची उपेक्षा आहे. पण मनात उत्तराची अपेक्शा ठेउन आपण वाचत जातो. सावलीला बिलगण्याचा प्रयत्न! दुसरे काय? पण शेवटाला अंगावर धावुन आलेल्या वादळाशी नजर मिळवण्याचे धेर्य होता होत नाही. ओलेत्या वस्त्रातल्या वेश्येला कितीही म्ह्टलं, तरि जग आई होऊ देत नाही.म्हणुन माझ्या-तुमच्यासारखा माणुस संध्याकाळच्या कविता वाचुनही जगत रहातो....वेश्येसारखा..so called practical! पण पुन्हा उत्तरांची अपेक्शा धरुन वेदना आणि आकांत define करायला ग्रेसच्या लेखणीची वाट धरतो...वाद्ळात घर बांधण्याचा अट्ट्ट्टहास आम्ही सोडु शकत नाही हे खरेच!

Monday, 15 August 2011

Shadows of the dreams


 At window I sensed an uninvited evening...her few rays kissed my forehead gently!  I glanced at her... Emily was silently gazing out of the window. She was looking at the autumn tree. May be she was dreaming... about night and mumbling silently. Her eyes were filled with dreams of eternity...yes I could see inside her but cannot touch her soul...it could be a cruel sin. I have heard  a myth that if you ever touch a butterfly ...it dies...you are not allowed to touch its soul. But I sensed her...her gentle whispers are for the evening. Those falling golden sheened autumn leaves are breathing in mystic scent of death along with her...
       Evening betrayed me...I felt painless fear...Evening has hungry, unsatisfied eyes of a priest in confession box. I wasn’t with her at her death...It was her last wish. I left with clouds in November. She waived her hand. I left hospital with fallen leaves and her poems. She died soon, had her salvation in autumn evening! Somebody had touched my butterfly......
       An autumn wind with passionate thrill rolled over my wounds...evening has passed silently and left a dead poet to live! I looked outside the window...Leaves were falling silently...a fearless pain. A compassionate twilight...a violent seductress!I lit a candle and opened her diary...
 “I had truth in his arms. But his dreams were too fierce...too lively, just like shadows of ancient ruins. I lived his poem for a while, now angels and fairies are dancing on my death on a soft tune of violin...a divine madness piercing my soul. I feel free from fear now...Church is near....”
    In the end she left nothing but the elegant death...two wings of a dead butterfly! A drop of life rolled over from my eyes on those dead wings. I know, Evening betrayed me......