Tuesday 23 August 2011

ग्रेस: एक संध्यामग्न वादळ


ग्रेसच्या या निर्मितीचा आस्वाद घेताना,त्यांच्या लिखाणाकडे फक्त एक गंभीर आणि वेगळं साहित्य म्हणुन निश्चितच पहाता येत नाही.या प्रश्नांच्या निर्मितीला कार्यकारणभावाची उपेक्षा आहे. पण मनात उत्तराची अपेक्शा ठेउन आपण वाचत जातो. सावलीला बिलगण्याचा प्रयत्न! दुसरे काय? पण शेवटाला अंगावर धावुन आलेल्या वादळाशी नजर मिळवण्याचे धेर्य होता होत नाही. ओलेत्या वस्त्रातल्या वेश्येला कितीही म्ह्टलं, तरि जग आई होऊ देत नाही.म्हणुन माझ्या-तुमच्यासारखा माणुस संध्याकाळच्या कविता वाचुनही जगत रहातो....वेश्येसारखा..so called practical! पण पुन्हा उत्तरांची अपेक्शा धरुन वेदना आणि आकांत define करायला ग्रेसच्या लेखणीची वाट धरतो...वाद्ळात घर बांधण्याचा अट्ट्ट्टहास आम्ही सोडु शकत नाही हे खरेच!

1 comment:

  1. वाद्ळात घर बांधण्याचा अट्ट्ट्टहास आम्ही सोडु शकत नाही हे खरेच!--true ...

    ReplyDelete