Wednesday, 24 August 2011

हरवलेल्या गीतातले काहीसे....

(1)ती गेली उत्तररात्री
     नाही परतली पाऊले
     तिच्या श्वासांनी बांधले
     घर मागेच राहीले....


(2)उरातुनी माझ्या जळे
     एक चंदनाचा दिवा
     परतली नाही
     तिने धाडला सांगावा!

(3) ये असे जवळ ये पोरी
     नको अंधाराला थिजु
     कवितेच्या गावा जाऊन
     सावल्या फुलांच्या वेचु

(4)  पात्रात नदीच्या पुर
      पलिकडे अडकल्या गाई
      दग्ध ओंजळीतली साय
      काळ कशी हिरावुन नेई? 


3 comments: