Friday, 19 July 2013

ECHO

स्ट्रेंजर बनुन फिरताना
माझ्या बालपणातून
विखुरलेली दिसतात मला
टुरिस्टस गाईडस रस्त्यांतून

एकट्या विराट शहराच्या
कोसळत्या खिडक्यांतुन
फूलपाखरांचे ना़जूक थवे
जातायत रेडलाईटमधून

सी दे हॅव डिपोर्टेड अ‍ॅलीस
प्लिज डू टेक मी टू हर
जिथपर्यंत तिचे किसेस
तरळतायत जिभेवर

तिची शिल्पं बरळतायत
मौनाच्या परिघाला समांतर
की मॅड हॅटरच आहे
omniscient परमेश्वर

सगळ्या वाटा चालल्यात
भगव्याशा खिंडीतुन
विराट दिंड्या घुमतायत
जॅझच्या गजरामधून

हे लव,
कम हिअर अँड जॉईन मी
विथ युअर कोरस ऑफ स्मोक
सत्याच्या गाभ्यावरुन आपण
चुरगाळून टाकू जग

आणि
त्यांच्या शाश्वत दु:खासह
वारकर्‍यांच्या दिंड्या
कोसळतील वंडरलँडमध्ये.

2 comments: