Sunday 3 June 2012

Blood Hymns - 1

ही माणसं एकत्र का रहातात?
कपल्स म्हणुन?
कुटुंब बनवुन?
शहरं वसवुन?
देश, धर्म??

पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो,
तेव्हा जाणवलं,
जिथे जिथे पोकळी आहे,
तिथे कुंटणखाने निपजलेले
आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन?
कुणास ठाऊक पण,
पोकळीला पर्याय नव्हते
संदर्भ नव्हते
तिथे आतमध्ये खुप सोप्पंय
किंचाळू नका श्वास घ्या
धपापु नका हपापुन घ्या
पाऊस पाडा पिकं घ्या
एकबारी, दुबारी..कितीही..
एक स्तन वासनेचा
दुसरा स्तन मायेचा

बाहेर व्यवहार - अर्थहिन
आतले व्यवहार - अर्थपुर्ण?
तशात मोकळी दारं घेऊन
एक नाशवंत बाई
माझ्या पायथ्याशी येते
येळकोट येळकोट
स्तनाग्र दिठी,
स्नायुंची मिठी
मासावरच्या त्वचेसकट
थरारते मांडी

शल्याचे अर्थ खोडत,
मी इंद्रियं उतरवतो.
माझ्या आवंढ्यावर
सोलीव थंड जीभ घेत,
तुझी समग्र सृष्टी
माझ्याच शरिरामध्ये
दुभंगुन पडते..

 स्पर्श चैतन्य वाहुन जातात.
मी तुझी इंद्रिय साठवुन ठेवतो.
पुढच्या दुष्काळासाठी.
एकेक कागदी होडी असते,
निर्वासित मांडीसाठी...

No comments:

Post a Comment