मिटलेल्या शरिरावर
फिरु द्यावा नांगर
भळाभळा सांडावी झिंग
आणि चंद्र असावा सहयात्री
असावीत त्याची पाळंमुळं
या लंबकांच्या देहात
विस्तव रंध्रकल्लोळात
ध्यानस्थ करुणा रत व्हावी
किल्मिषांचे रुतावे रंग
भग्नावे शुन्यशिल्प,
या चंद्र समाधीवरती
चंद्रपुष्प मी व्हावे
ऐसीअक्षरे दिवाळी अंक २०१२
ReplyDelete