Wednesday, 7 November 2012

SOLO IMPOTENCE


कॅफेटेरियात
वारुळ ढोसत
बसलेली नागडी माणसं
कसल्याशा कुंपणांनी,
गोंदवत बसलीयत
आपली उघडी शरीरं.

'तु अजुन कपडे काढ.
मी माझेही काढतो.
त्वचा उतरवुन ठेव
मी माझीही ठेवतोच.
तुझा कोथळा उतरव
आणि मला दे.
माझा तुझ्या हातात घे.
आपल्या,
पेशीपेशींमधल्या मरणफुलांचा
गुच्छ बनवु आणि
सात जणात
सुखासमाधानाने
गिळुन खाऊ.
रक्त पचवु.
धागे उपसु.

नाहीतरी,
जगुन झालेल्या पारदर्शक रक्ताने,
प्रत्येक पेशींमधले मेंदु सैरभैर आहेत,
होणारी प्रत्येक नवी मांडणी
विटाळत नाहीये एकसंधपणे.
शरीरविरहीत जग बनुन,
चिडिचुप वखवखलेपण घेऊन,
केवळ मनं का सडत नाहीत??
भग्नतेची शिल्प होऊन,
भोगलेले सगळे अनिर्णित प्रश्न
कुठल्या शहरात निघुन जातायत??'

2 comments: