मला वाटतं की, 'ग्रेस हा अब्सर्ड कवी आहे.' आता हे विधान वाचताना
वाचकाच्या मनात या वाक्याबद्दल अनेक प्रश्न उभे रहात असतील. म्हणून मी आधी
अब्सर्ड या शब्दाची नीट व्याख्या करतो(?!?). अल्बर्ट कामूच्या अब्सर्डिस्ट
तत्वज्ञानानुसार, अस्तित्वाचा अर्थ शोधणारं मन आणि कोणताच ठाम अर्थ नसलेलं
निरर्थक जग यांच्यातल्या मुलभूत भेदामुळे अब्सर्ड मानसिकता तयार होते.
संपुर्ण वास्तव हे एकमेकांशी जोडलेलं,एकमेकांवर आधारीत,सहसंबंधित किंवा
अन्य कोणत्याही प्रकारच्या तर्कशात्रीय मांडणीत असतं का? याचं नक्की उत्तर
अजुन देता आलेलं नाही. आपल्याला संपुर्ण वास्तवाचे ज्ञान आहे
का? मानवीय दॄष्ट्या ते अशक्य आहे. कारण आपल्या जाणीवांच्या टप्प्यात
येणार्या विश्वाला आपण वास्तव म्हणुन संबोधतो आणि त्याला एका ठराविक
तर्कशात्रीय मांडणीत बसवू पहातो.त्याद्वारे एक ठराविक अर्थ असलेली संदर्भ
चौकट आपण बनवू पहातो (आपल्याला लांबी मोजायला फूटपट्टी लागते ना, तशीच.)
आणि त्या संदर्भचौकटीचा वापर करुन आपण इतर गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न
करतो. ग्रेस यांच्या कविता वाचताना मला जाणवले की, त्यांना एका ठराविक
अर्थाकडेच पोहोचायचे आहे असे वाटत नाही. आपली कविता अंतिम वाक्य नाही याची
त्यांना पुरेपूर जाणीव आहे. हे मी का म्हणतोय, हे त्यांच्या पुढच्या काही
विधानांवरुन स्पष्ट होते.
'माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती व तिचा आस्वाद या त्रिवेणीसंबंधी महत्वाचे प्रश्न निर्माण केलेत.'
मुळात असं की मी प्रश्न निर्माण केलेत, कशाची उत्तरे दिलेली नाहीत वा द्यायचा प्रयत्न केलेला नाही हे मान्य करणंच महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीची जडणघडण कशी आणि कुठल्या टप्प्यात होते आणि त्यात आपले स्वतःचे स्थान नक्की काय व कोणते याची व्यापक जाणीव असलेला हा कवी आहे. ग्रेस यांनी कुठेही संदिग्धतेला (कन्फ्युजन) नाकारलेलं नाहीये.
'पळवाट नकोच आहे मला, हवीये फक्त दु:ख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता'
हे समजून घेताना आधी 'something -genesis-something' म्हणजे काय ते ही समजून घेतले पाहीजे. माझ्या आधी ही अर्थहीन जग होतं(something), आता मी आहे. मी माझ्या अमर्याद स्वातंत्र्याच्या बळावर, माझ्या अस्तित्वाला आणि त्याच्या जाणीवांना माझ्या आकलनात असणार्या संदर्भांतुन तौलनिकरित्या अर्थ देईन, देत राहीन.(genesis) यापुढे माझ्यानंतर ही अर्थहीन जग कायम राहील.(something) संपुर्ण अर्थ किंवा पुरेपूर निरर्थकता यापैंकी मी काहीच अनुभवू शकणार नाही. ग्रेसच्या कवितेत येणारी संदिग्धता आणि आपला प्रवास हा संदिग्धतेकडून संदिग्धतेकडेच आहे हे दर्शवणं मला नेहमी जाणवतं. तोच प्रकार त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जगताना घेतलेल्या भुमिकेमध्ये ही जाणवतो.
'माझी कविता हे एक बेट आहे. मी ही एक बेटच आहे. या बेटावरुन परतवण्याची हमी मी वाचकाला देत नाही. त्याने स्वतः होडी होऊन गेले पाहीजे.'
स्वतःला आणि मुख्यतः स्वतःच्या निर्मितीला एका बेटाची उपमा देऊन त्यांनी आपल्या अस्तित्वाचा स्थायीभाव दर्शवला आहे. मी कुठेही जात नाहिये आणि कुठुनही येत नाहीये. मला काही विशेष उद्दिष्ट साध्य करायचं नाहीये. मी केवळ आहे आणि स्वतंत्र जगतोय. स्वतःच्याच आयुष्य जगण्याच्या पद्धतीतुनसुद्धा त्यांनी हाच दॄष्टिकोन दिलेला आहे. त्यांच्यावर दुर्बोधतेचे कितीही आरोप झाले तरी, स्वतःच्या कविता वाचकांना समजावुन सांगाव्यात असे त्यांना वाटले नाही. त्यांनी कुठलाही अजेंडा राबवला नाही. नाहीतरी लोकप्रियता हे एकप्रकारचे मास सेन्सिबिलिटी मिथ आहे.
शेवटी अब्सर्ड व्यक्तीसाठी कोणतीही गोष्ट समजावुन सांगणे किंवा सोडवणे महत्वाचे नसते तर ती स्वतः अनुभवणे आणि स्वतःच्या अनुभवांचे वर्णन करणे हे महत्वाचे असते. ग्रेस यांच्या काव्यात हा गुणधर्म विशेष आढळून येतो. त्यांच्या कवितेचे 'इझम' बनवता येत नाही.ग्रेस यांच्या कवितेला स्वतंत्र अस्तित्व आहे, ते आढळुन येतं जेव्हा ते स्वतः द्वैती असल्याचं कबूल करतात.
(वरील लेख ही केवळ एक मोठी प्रतिक्रिया आहे.मी कुठेही ग्रेस यांच्या कवितांचा परामर्श घेऊन त्यांचा अब्सर्डिटीशी संबंध जोडलेला नाहीये. जी वाक्ये घेतलीयेत ती केवळ त्यांच्या ललितलेखनातुन घेतली आहेत.पण ग्रेसांचं लिखाण अब्सर्ड अंगाने
समजावुन घ्यायचा प्रयत्न करता येईल आणि त्यातुन मिळणारा आस्वाद फार वेगळा असेल असे माझे मत. ग्रेसांच्या बेटावरुन परतताना स्वतः जहाज बनण्याचा हा माझा प्रयत्न. वेगळ्या अंगानेही सेन्स देउन ग्रेस समजावता येऊ शकतात आणि इथले बरेच जण ही कविता आपल्या अंगाने समजावून घेऊन त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत आहेत, after all 'we have art in order not to die of the truth'- Nietzsche) - हरवलेल्या जहाजाचा कप्तान