Monday, 18 March 2013

Anonymous-Unanimous

पाऊस पडून गेल्यावर
टप टप करत
कुठ्ल्याशा
झाडाच्या अंधारया सावलीतुन
थेंब थॆंब गळतायत.
त्याच्या तालावर
मी घड्याळाची टिकटिक
सिंक्रोनाईझ करतोय.
टप टिक टप टिक
टीक टिक टप टीक
टप टप टिक टिक
टेकलेपण.
रिकामपण.
निष्फळपण.
या आवर्ती स्प्लिट्समध्ये
मध्येच कुठेतरी दिसतोय
गाणारा जिप्सी.
अँड इट्स अ साँग अबाऊट
प्रोलाँग्ड सायलन्स.....
---------******-----------------
या वस्त्रगाळ एकांतात
मला उगाचच वाटतं रहातं
की एक नरभक्षक
चवीने खातोय
माझं संचित.
--------****--------------
भोवरयाची गती फाटली
मेंदू फोडुन,
बाहेर पडला
तो
नेमका माझ्या सावलीवर.

No comments:

Post a Comment