Thursday 5 June 2014

लूप्स आणि ल्युब्रिकन्टस

निरपराध माणसं मारणार्‍यांनी,
त्याला खुलं समर्थन करणार्‍यांनी,
केवळ मनातल्या मनात खुष होणार्‍यांनी,
चुकीचं वाटूनही सुप्त आनंद झालेल्यांनी

निरपराध माणसं मारावीत.
त्याला खुलं समर्थन करावं.
मनातल्या मनात खूष व्हावं.
चुकीचं वाटलं तरी सुप्त आनंद घ्यावा.

तरीही कमी पडलंच तर, (नक्कीच पडेल)
मैथुनाचा आनंद घ्यायचाच असेल तर,
शिवाजी पार्कसारखं काहीतरी बूक करा.
जमा सगळ्यांनी एकत्र.
करा आपली गटारं मोकळी.
हातही मोकळे करा.
काढा आपली लिंगं बाहेर
एकमेकांची वेश्या होऊन
एकमेकांची साफ चिघळवून टाका

आपापली हिन-दीन 'संस़्कृती'
आपापसात धरुन खेचा.
दातांनी, नखांनी ओरबाडा.
कपडे फाडून यथेच्छ पिळा.
उधळा.
पालथी पाडा.
सगळे सोपस्कार करा.

मग
सनातन संस्कृतींच्या अनौरस पिढ्यांनो,
मग उरली सुरली भेगाळलेली
हीच संस्कृती स्वतःला लागू करा.
बनवा नवी जातीव्यवस्था
होउ दे निमिषार्धात
पुन्हा शतकांनुशतकांची प्रक्रिया
स्तोत्रं,धर्म,तलवारी, बंडखोरीच्या
न जाणो कितीतरी लक्ष योनींतुन
जाउदेत तुमची लक्तरं.

जेव्हा शेवटाला तुम्हालाच
प्रत्येक शतकांत
प्रत्येक कोपर्‍यांत
जिथेतिथे स्वतःच सोडलेल्या विष्ठेचे संदर्भ लागतील,
तेव्हा कदाचित तुम्हाला
होतील आत्मिक साक्षात्कार!!
आपला सगळ्यांचा जन्म इथुन तिथुन नव्हे
तर प्रत्यक्ष ब्रम्हाच्या विष्ठेतुन झाल्याचे,
माणसाच्या दुरवर अथांग पसरलेल्या
भुकेच्या वाळवंटाचे,
त्याच्या तिळतिळ तुटणार्‍या आतड्याचे,
मुक्त उमलणार्‍या फुलणार्‍या जीवांच्या सुक्ताचे,
प्रेमाच्या प्रबळ आंतरीक उर्मीचे.

तेव्हाच तुमच्या बांधलेल्या जगातुन
मुक्त माणसांचे तांडे बाहेर पडतील
माणसांच्या दिशेने.

No comments:

Post a Comment