Thursday, 13 October 2011

Calcutta brothel (वेदना क्र. ३२)

Calcutta brothel मधुन
अस्फुट स्वरांचे ढग लहरत येतात..
मी सुन्न पायरीशी बसुन असतो,
फिडल वाजवत..
माझ्या व्रणांना लागलेलं
वीर्य चाटुन घेतात, फिडलच्या लाटा..
भुकीने भारलेल्या
वासनेच्या पायथ्याशी
भातुकलीचा खेळ ऎन रंगात असताना...
दग्ध वेदना जोजवत असतो
मनातला उपाशी priest!
बाहुलीचे सोनेरी केस हुंगुन,
शरीर सांधुन...तो उठतो.
करवादणारया लाकडी पायरयांवरुन
मला स्पर्शुन जातं एक आदिम जनावर...
त्याचे उरले सुरले गरम उच्छ्वास
माझ्या सुरात ठेऊन जातात
काही पेनीज आणि वेदना क्र. ३२...
तेव्हाच ती दारात येते
चिरंतन प्रश्नांचे पदर सावरत.
अंधारातली छद्मी हास्यं
वासनेनी उतु जाणारी रंध्रं
गढुळ सत्वाची स्तोत्रं
हवाली करते शांतपणे
मुक्या स्वप्नांच्या समुद्रात....
तिला न बघताच उमजतं
माझी fertile भुक हिस्सा मागतेय.
ओथंबलेली नाणी माझ्यावर
फेकुन ती म्हणते...
Go son, fetch the bread!




Bourgeois Saint

oh, lonely, lonely, lonely saint
clock is ticking all in vein
playing with dices lonely saint........

see love is around the corner
and me,sysiphus pushing boulder
playing with dices lonely saint.......

Tuesday, 11 October 2011

कोजागिरी


पीक उभारलं गं .....बये उभारलं गं
श्रावणाच्या धुंदीत शहारलं गं
टपोरया मोत्यांचा कसा गं फुले
पिसारा गं?.........


पीक बहरलं गं .....बये बहरलं गं
वारं अलगद त्याला गोंजारी गं
वाटु गं सोनं दसरयाला कसं?
सोनं शेतात गं.......

उजळती राती पुनवेच्या गं...........बये पुनवेच्या गं
राया अंगणी घेऊनी हाती चांदण्या गं
सांभाळु शालु कि लाज सांभाळु?
मज कळेना ग........

चांदणधुळ ही बये उशाशी गं.......बये उशाशी गं
बावरा शकुन मनाशी गं
रात टेकली देखण्या चंद्राच्या
छातीवर गं.....

Friday, 7 October 2011

आकांतांचे देणे



क्षितिजे धुळीने मळतील
आयुश्याच्या सांजक्षणी
तु वळुन पहावे परतुन
माझ्या रुपेरी हिरकणी

येतील उन्हाच्या वाटा
जातील परतुनी सगळे
तुझ्या मनाच्या कुशीत
माझी चंदनपणती उजळे

सांग तुजला काय देऊ
आपला पेशा फ़किरी
मिळे तुजला एकला कबीर
व्यथित पावलांच्या परि

येता आयुश्याची सांज
तु मला साद दे
तु माझे आवर्त घे
या जगाशी झुंज दे

IN MY DREAMS...

Insider me:yes i dream about god

darvesh:if you do dream about God...thereby accepting the possibility of Him existing then your are definitely NOT an atheist...

Insider me:many time i dream about many virtual things
god is one of them
created by other people
by heart i am an artist
i would love to use this greatest fake delusion like a puppet
i am atheist cause on my selfish side i just dont need god!!
yes,
i am just like omar khayyam who decieves this delusion in his charming language. he said,
Look not above, there is no answer there;
Pray not, for no one listens to your prayer;
Near is as near to God as any Far,
And Here is just the same deceit as There.

And do you think that unto such as you;
A maggot-minded, starved, fanatic crew:
God gave the secret, and denied it me?--
Well, well, what matters it! Believe that, too.

"Did God set grapes a-growing, do you think,
And at the same time make it sin to drink?
Give thanks to Him who foreordained it thus--
Surely He loves to hear the glasses clink!"

darvesh: blasphemous sinner.....

insider me:darvesh let the darkness enter my heart like a storm ,let me vanish within me not in ur god delusion
OH DARVESH AVENGE MY DEATH!!!!
i am atheist cause i always dream about god. In my dreams god is asking himself a same question 'TO BE OR NOT TO BE'
if its blasphemous to disregard the God delusion then nail me to cross upside down and call me Peter...

Tuesday, 4 October 2011

जीवनसंध्यासुक्त

संध्येने स्पर्शता मेघ
भासांची अनवट वेणी
भय अवचित घेऊनी आले
लाटांच्या मागुन कोणी

ते नादस्पर्श लहरींचे
बाहुलीचा खेळ चिमुकला
म्रुदगंध तुझ्या वारयाचे
पैंजण अजुनी उशाला

संध्येला बिलगुन आले
ते खेळ जुन्या सरींचे
रक्तात पुन्हा साकळती
जांभळे दाह स्वप्नांचे

आरक्त उन्हाचे दुत
संध्येचे खेळ मनाला
आभास बिलगता उरले
हे क्रुष्ण मौन राधेला

गर्भारुन येता पेशी
पणतीच्या विझल्या वाती
मीरेच्या पडवीपाशी
चोचीत सावल्या घुमती

तो येईल अलगद कोणी
राऊळे शुभ्र गगनाला
तु नाहीस समईपाशी
गोंदणे नयनकमळांना

Monday, 3 October 2011

NOWHERE LAND मधुन,



wen i was behind the lost trail of someone leading to 'NOWHERE LAND' i found a pirate song.....एका मृत माणसाच्या छाताडावर पंधरा माणसं ....यो हो हो हो .......... एका मृत माणसाच्या छाताडावर पंधरा माणसं ....यो हो हो हो .......... पुढच्या रस्त्याला लागलं कि दिसतं,वाकड्या वळणावर एक प्रेत नजाकतीने जळतयं, मांसाच्या धुराचे सावळे ढग दिगंतात हरवुन जाता आहेत....मरणारा कवी होता....त्याची वेदना अनौरस होऊ नये म्हणुन त्यांनी एक छोटासा ढग कुपीत बंदिस्त करुन ठेवला...आणि उरलेल्या राखेजवळ त्यांनी पोवाडे सुरु केले.

Sunday, 2 October 2011

Autopsy

भातुकलीच्या खेळाची जेव्हा क्रुसेड्स होतात...
तेव्हा i get 15 min of my fame!
सुबोध घातकी दंश माझ्या मागावर असतात,
आणि दरीच्या दुसरया टोकाला लगडलेली असते माझी कविता.....

Saturday, 1 October 2011

कवडसे जपणारी मुलगी



वारयातच विरुनी जाती
ते मुक्त भटके पक्षी
लाटाही कोरुनी जाती
वाळुवर अल्वर नक्षी

ती अशीच उमलत राहे
चांदणे जसे उशाशी
माळुनी उन्हाचे फुल
ती असे किनारयापाशी

जसे निशेच्या पटलावरती
बावरी चांदणधुळ उशाशी
तसे उन्हाच्या भिंतीवरती
ती पाऊस कोरित राही