Tuesday, 4 October 2011

जीवनसंध्यासुक्त

संध्येने स्पर्शता मेघ
भासांची अनवट वेणी
भय अवचित घेऊनी आले
लाटांच्या मागुन कोणी

ते नादस्पर्श लहरींचे
बाहुलीचा खेळ चिमुकला
म्रुदगंध तुझ्या वारयाचे
पैंजण अजुनी उशाला

संध्येला बिलगुन आले
ते खेळ जुन्या सरींचे
रक्तात पुन्हा साकळती
जांभळे दाह स्वप्नांचे

आरक्त उन्हाचे दुत
संध्येचे खेळ मनाला
आभास बिलगता उरले
हे क्रुष्ण मौन राधेला

गर्भारुन येता पेशी
पणतीच्या विझल्या वाती
मीरेच्या पडवीपाशी
चोचीत सावल्या घुमती

तो येईल अलगद कोणी
राऊळे शुभ्र गगनाला
तु नाहीस समईपाशी
गोंदणे नयनकमळांना

1 comment:

  1. very nice.....u r on right track.. my good wishes are always with you......

    ReplyDelete