Wednesday, 7 November 2012

SOLO IMPOTENCE


कॅफेटेरियात
वारुळ ढोसत
बसलेली नागडी माणसं
कसल्याशा कुंपणांनी,
गोंदवत बसलीयत
आपली उघडी शरीरं.

'तु अजुन कपडे काढ.
मी माझेही काढतो.
त्वचा उतरवुन ठेव
मी माझीही ठेवतोच.
तुझा कोथळा उतरव
आणि मला दे.
माझा तुझ्या हातात घे.
आपल्या,
पेशीपेशींमधल्या मरणफुलांचा
गुच्छ बनवु आणि
सात जणात
सुखासमाधानाने
गिळुन खाऊ.
रक्त पचवु.
धागे उपसु.

नाहीतरी,
जगुन झालेल्या पारदर्शक रक्ताने,
प्रत्येक पेशींमधले मेंदु सैरभैर आहेत,
होणारी प्रत्येक नवी मांडणी
विटाळत नाहीये एकसंधपणे.
शरीरविरहीत जग बनुन,
चिडिचुप वखवखलेपण घेऊन,
केवळ मनं का सडत नाहीत??
भग्नतेची शिल्प होऊन,
भोगलेले सगळे अनिर्णित प्रश्न
कुठल्या शहरात निघुन जातायत??'

Friday, 2 November 2012

शुन्यस्पर्श


मिटलेल्या शरिरावर
फिरु द्यावा नांगर
भळाभळा सांडावी झिंग
आणि चंद्र असावा सहयात्री

असावीत त्याची पाळंमुळं
या लंबकांच्या देहात
विस्तव रंध्रकल्लोळात
ध्यानस्थ करुणा रत व्हावी

किल्मिषांचे रुतावे रंग
भग्नावे शुन्यशिल्प,
या चंद्र समाधीवरती
चंद्रपुष्प मी व्हावे

Thursday, 1 November 2012

God & So. pvt.ltd


behind the stairs,
where
dead's been lying
women getting wet
babies keep dying
junkies love screaming
pigs lonely sighing
there
i kept my gods
of fractured nourishment.

looking at them
with eyes of purple pain
nights of bizarre singing rain
accusing lost names
i lay my backs
on desired confusion

lets get smitten
on the doors of heaven
kneel down in celebration
through madness we're driven
and here you are busy
rhyming your crimes

fear the wars
fear the scars
fear the dungeons
fear the guillotine
fear the gods
fear the reason
fear the love

here,
pale faces walking with rotting defiance.
slaughtered souls warming beds in act of silence.
cheering crowd scratching walls of asylums
but then,
a young naked man with autumn dew
he will keep a mirror in front of you
then cheer oh lord,
'Hail Mary...Hail Mary!!'
and decide quickly,'whose real? Him or You ?'

Tuesday, 30 October 2012

SOULS AT 2 PM

सेन्योरा,
तेवत ठेव उघडा दिवा
इंद्रियांचा गुंता घेऊन,
सडत चाललेल्या देहाला
पाहशील आरसे लावुन,
तेव्हा फुलपाखरांचे थवे
जातील रेडलाईट मधुन.

हे एंटोनिओ,
तुला तुझा स्पर्श तुझाच असतो
माझा तुला स्पर्शही तुझाच असतो
मग क्षणोक्षणी भंगणारं
तुझं शरीर
कधी जगता येईल का मला?
असा सल ठेऊन ,
मी माझ्या आत लपवलाय
फुलपाखरांचा थवा.

Wednesday, 5 September 2012

Trinity : love, sex & vanity

LOVE
प्रेम प्रेम म्हणाजे काय असतं?
तुला माहीतीये?
माहीत असलं तरी काय?
तु नेहमीप्रमाणे उभी राहशील,
आपल्या काजळभरल्या डोळ्यांसकट.
परमेश्वराकडे दोन्ही हात करुन,
डोळे गच्च बंद करशील.
मला गच्च मिठीत घेशील.
सेन्योरा,
प्रेमातलं रॅशनल-प्रॅक्टीकल
मला काही कळत नाही.
कळपांची चरित्रं लिहिण्याचा
मला सोस नाही.
तेव्हा बिवेअर,
माझ्या त्वचेत प्रिझर्व केलेली
सगळी जुनी गंधिल वस्ती
तुझ्या मिठीत झोपेल.
तेव्हा आत्ताच भोगुन घे
हे दगडी मौन
मी पुन्हा कधीतरी
तुझ्यापासुन दुर
एकांतात तुझ्यावर प्रेम करेन.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
SEX
मी प्रेम शोधत नाहीये खरं.
मी काहीच शोधत नाहीये.
काहीच नसणं हेच आहे ना अ‍ॅब्सोल्युट?
जाणिवेच्या भिंती
कोसळुन पड्ल्या, तरी
पुन्हा उभ्या रहातायत!
एकदा प्राण घेतला तरी
तो कावळा कसा
तिथेच बेसावध फिरतोय?
बाप मेल्यावर केस भादरुन,
विदुषक पुन्हा पुन्हा का हसतोय?
जिथे माझे ठसे आहेत
ते प्रदेश माझे नाहीत
पुन्हा मागे फिरुन पाहिलं,
त्या वस्त्या,ती बेटं
हेही आता उरले नाहीत.
आता पुन्हा जांघेतुन देह
आरपार नेण्याचा
पर्याय असेल मला?
पहाटे पहाटे
डॉन जुआनच्या पेंटींगमागे
मी लपवलाय आरसा
--------------------------------------------------------------------------------------------------------------
VANITY
माझ्या गंधाच्या थारोळ्यात
पडलेलं तुझं शरीर,
स्वतःशीच घे गोंजारुन
आणि चर्चबेल ऎकत,
मी घेतो दगडी श्वास.
ते बघ,
वहात चाललेत
स्ट्रीट्लाईट्खालुन असंख्य
शिळॆ देह,
हाडामासांची ओझी वहात,
मॆंदुतल्या इल्युजन्सशी
मास्टरबेट करत
केऑसबरोबर जगणारे
समांतर हात
आणि
आपण दोघेही पसरलो आहोत,
तिथेही
स्ट्रीट्लाईट्खाली
कुणाच्या न कुणाच्या तरी
टाळक्यात दबा धरुन,
गेल्या वसंताची वाट पहात.

Tuesday, 28 August 2012

सेन्योरा एक्स

वास्तवाचा उत्सव साजरा करतानाच
दिवे जातात
तेव्हा जाता जाता दिसलेली
ब्लुजमध्ये थिरकणारी तुझी पाठ
अखंड पावसात वाहुन गेलेली पहाट
तुझ्या खिडकीकडुन वळणारे रस्ते
केसांत फिरणारे दगडी हात
छातीवरची जखम

तुझ्या बिछान्यात झोपणारी शिल्प
अढळपणाच्या दिप्तीने तुझ्या शरिरावर
सिगरेटचा धुर सोडणारे अल्टर इगोज
या सगळ्याचं मी काय करायचं?

उद्या एकांतात तुझ्या शरिरावरुन हात फिरवशील
तेव्हा माझा विचार करण्यापुरता
हा विचार झाकुन ठेव. बास

Tuesday, 5 June 2012

Blood Hymns - 2

मुळांनी खोड शोषुन घेतले,
जेव्हा अ‍ॅन्जेल्स वीटेवर झोपले.
क्रुसावरती निर्वात लटकवला.
सर्वांनी त्याची भक्ती केली.
कालचा मी,
आजचा मी,
उद्याचा मीच्या,
गात्रांमध्ये राक्षस आहे.
काळ त्याला लिबरेट करेल.
देह त्याला जनरेट करेल.
पण आत्मा मी मुक्त ठेवलाय.
तो शेवटच्या खोलीत
शांतपणे मुततोय.
मुर्दाड कावळे,
लोचट भिकारी,
थंड वेश्या,
भडवे पुरोहित,
यांना घालतोय
बंबाळ तुकडे

एक तुकडा इथे भिरकावला
तिथे धावा
दुसरा या इथे आभाळात
त्यावर झेपा
स्वतःच्या विषात
स्वतःचाच बळी
अळीमिळी गुपचिळी
विकार द्या
विकार घ्या
साठवलेल्या बुरशीमागचे
सगळे सारे चोपुन घ्या

बहात्तर ठोके
सत्तर वाटले
दोन जगले
मग स्वतःच बहिरा झालो
संचित सारे पुन्हा ऐकले.
सगळे ढोसुन स्फुंदत बसलो
तेव्हा आरशामागुन तो हसला
त्याने,
ग्रंथ् पेटवले
धर्म बुजवले
कोवळी कुजकी भुल जाळली
भरल्या नाळेतले स्पर्श विझवले
माझ्या शहराचे भाग केले
सगळी सुत्रं स्वतः हलवली.
मी प्रतिकार करायला गेलो
तर मलाच आरशात ढकलले
आरशांची दार बंद केली
आणि त्यावर लेबलं लावली.
a wise man must know how to avoid deception!

Sunday, 3 June 2012

Blood Hymns - 1

ही माणसं एकत्र का रहातात?
कपल्स म्हणुन?
कुटुंब बनवुन?
शहरं वसवुन?
देश, धर्म??

पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो,
तेव्हा जाणवलं,
जिथे जिथे पोकळी आहे,
तिथे कुंटणखाने निपजलेले
आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन?
कुणास ठाऊक पण,
पोकळीला पर्याय नव्हते
संदर्भ नव्हते
तिथे आतमध्ये खुप सोप्पंय
किंचाळू नका श्वास घ्या
धपापु नका हपापुन घ्या
पाऊस पाडा पिकं घ्या
एकबारी, दुबारी..कितीही..
एक स्तन वासनेचा
दुसरा स्तन मायेचा

बाहेर व्यवहार - अर्थहिन
आतले व्यवहार - अर्थपुर्ण?
तशात मोकळी दारं घेऊन
एक नाशवंत बाई
माझ्या पायथ्याशी येते
येळकोट येळकोट
स्तनाग्र दिठी,
स्नायुंची मिठी
मासावरच्या त्वचेसकट
थरारते मांडी

शल्याचे अर्थ खोडत,
मी इंद्रियं उतरवतो.
माझ्या आवंढ्यावर
सोलीव थंड जीभ घेत,
तुझी समग्र सृष्टी
माझ्याच शरिरामध्ये
दुभंगुन पडते..

 स्पर्श चैतन्य वाहुन जातात.
मी तुझी इंद्रिय साठवुन ठेवतो.
पुढच्या दुष्काळासाठी.
एकेक कागदी होडी असते,
निर्वासित मांडीसाठी...

Tuesday, 22 May 2012

Random at my 'REICHSTAG' - 2

burn the words with the mass of fantasized unclarity; u get a poetry. sometimes,unclarity of one does coincide with others rationality. whenever i write something, My faith gets fragmented in dreams to reincarnate my existence as an anonymous.

..............................................................................................................................................

once, a butterfly with her wings sat on my shoulder. I plucked few of her hymns and asked..'do u have a name?'
She said,'why,do i need one?'

...............................................................................................................................................

a poet and his readers sit by the opposite sides of the river called 'poetry'

...............................................................................................................................................

let us exchange our fears,hallucinations and mysts....inject your hysteria into mine, and when we will drink IT....they'll call it 'love'....we will call it being a muse for each other. Let us get cradled by mother Mnemosyne. -from the pockets of David mullah 

....................................................................................................................................................

मानवी अस्तित्वाला (स्वभाव+जडणघडण+निर्मिती) अनेक पैलु असतात. पण त्याचा तळ गाठायचा प्रयत्न , किंबहुना विचारही आपण करतो का?
blood, violence,
sex,bodies,bones,limbs
tongues,seduction,pain
sadism,anarchy, death
हे सगळं आपण वाचतो, ऎकतो आणि अनुभवल्यासारखं वाटुन घेतो. इथेच येते disgustची पेशीपेशीतुन पाघळत जाणारी भावना? ही कुठून येते? मी म्हणेन, इथे तर अद्न्यातातही सुख नसतं. स्थैर्याचा ध्यास घेतलेले आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो, तेव्हा दुसरया टोकाशी सुद्धा आपणच असतो.


  ....................................................................................................................................................


....................................................................................................................................................

oh bird oh my bird
drop dead around me
i can only let you fly
open wings around me!


   ....................................................................................................................................................

एकटेपणाने तलावाकाठी बसुन,काठाजवळ आलेलं अर्धवट सडलेलं शव बराच वेळ नुसतं पहातोय. त्याच्या मेंदुचा भाग उघडा पडुन त्यातुन त्याच्या सगळ्या स्मृतींचा तवंग पाण्यावर पसरलाय. त्यातली सर्वात भडक मी स्वत:च्या त्वचेवर ठेऊ पहातोय ...जेणॆकरुन तीचा प्रवास माझ्या शरीरातुन व्हावा इतपत की पुढे विचार करताना, कोण मी? कोण तु? असे प्रश्न एकमेकांना विचारणारं दोन तोंडांचं मन आत जन्माला यावं.
...........................................................................................................................................................

The humans have need of expression of almost anything they experience. but there is an eternal impossible correspondence between an actual experience and its description. But still we carry our own version of reality as our truth. we need the finite character of language against the immortal infinite reality which life grants us. do we excrete life, with our conversations and scriptures? If we stopped to do so, could we die from an overdose of LIFE??
................................................................................................................................................................
I knew a man who was there. who was always there. he looks like me,dresses like me, talks like me, even he thinks like me. but he who pours his prayers into oblivion, sitting on a mountain. A mountain made up of the ashes of TIME. Ashes of this very minute and of all those things which lost their fraction of existence during this minute. he is constantly writing all that. A never ending poem or a never ending prayer? Randomly touching all the empty names of his reality. But I wish he should die, loose his immortality just like that. so, his death would become the entire essence of his poetry.
..............................................................................................................................................................
कुठल्याही थेअरीतुन जर ज्ञाता (observer) बाहेर काढला, तर ती धडाधड कोसळून पडेल. आपल्या जाणीवेपलिकडे जगात घडणार्‍या गोष्टींची निरर्थकता लक्षात घेण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. आपल्या जाणीवेच्या ज्ञानातुन आपल्या जीवनाला अर्थ देणार्‍या हजारो वेगवेगळ्या मोजपट्ट्या घेऊन आपण वावरतो. पण आपल्या जाणीवा या आपल्याच जाणीवा आहेत का? त्या स्वतंत्र आहेत का? की त्या कुठल्यातरी नैतिक सुत्रावर, परंपरेवर, धर्मावर व इतर कोणत्याही दॄष्टीकोनावर जशाच्या तशा आधारलेल्या आहेत? मानवी अस्तित्व आणि त्याचा अमर्याद स्वातंत्र्याच्या दिशेने होणारा प्रवास ही पुरेपूर व्यक्तीनिष्ठ बाब आहे, तीचे सरसकटीकरण किंवा एकसुत्रीकरण करणे म्हणजेच त्या स्वातंत्र्याला तिलांजली देणे. आपल्या कडे आत्मभानाची व्याख्या आणि पर्यायाने परंपरा ही बनवली जाते. हाच मोठा गंमतीचा भाग आहे, हे म्हणजे मला आलेलं जगण्याचं भान दुसर्‍यालाही अगदी तसच्या तसं आलं पाहीजे हा आग्रह. आत्मज्ञानी माणूस आत्ममग्न नसेल काय? तो जगला, त्याने अनुभवलं, त्याला समजलं आणि तो निमुटपणे निघुन गेला, हे समजणं जास्त आवश्यक आहे. शेवटी आपल्या सगळ्या फुटपट्टया एकवार घासुन बघायला पाहिजेत. त्यातुन मला जे सापडेल, ते माझं आणि केवळ माझ्यासाठी असेल कारण दुसरा माणुस जर तिथे उपटला तर मठ तयार झालाच. शेवटी मीच माझा ज्ञाता बाकी कोणीही नाही.
.................................................................................................................................................................

नव्या शतकांत आपल्या कक्षा जस जशा रुंदावत गेल्यात तसतसे आपले प्रश्न ही वाढीस लागलेत. हे सगळंच बिर्‍हाड घेउन जगताना जगाच्या कानाकोपर्‍याला आपण स्पर्श करु शकत नाही. तेव्हा वाचन हे स्वस्त आणि कमी त्रासदायक माध्यम आपण वापरतो. पण आपण कॅथार्सिस करतो का? हो आपण करतो पण ते दिवसेंदिवस खुप कमी होत चाललंय. आपण केवळ एक डेटाबेस बनत चाललोय. तोसुद्धा एक रिस्ट्रिक्टेड डेटाबेस.
'जेव्हा मी कोसला वाचतो, स्ट्रेंजर वाचतो किंवा एखादा चित्रपट पहातो तेव्हा स्वतःला त्याच्याशी रिलेट करतो. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याला त्या साच्यातुन घुसडू पहातो आणि त्याला एक निश्चितपणा ,एक अर्थ देऊ पहातो. मग मी माझं पुढचं जगणं ही तसंच प्लान करतो जणू मी एखाद्या नाटकाची संहिता जगतो आहे. ह्या प्लानिंग मध्ये मी जेव्हा पाडगावकर वाचुन संपवतो तेव्हा मला संदिप खरे वाचावासा वाटतो. आणि त्यानंतर दुसरा तत्सम कोणीतरी, कारण मी मुळत: पाडगावकरांच्या लिखाणाशी रिलेट झालेला असतो, आता पुढे कुठे कुठे रिलेट व्हायचं ह्याची नेमकी चाकोरी मी घालुन घेतलेली असते. थोडक्यात एक मन म्हणुन वस्तुची जाणीव अनुभवताना मी स्वतःच वस्तु झालेला असतो. जेव्हा हे मी इतरांना सांगतो तेव्हा मला जितकं दु:ख वाटलं/हर्ष वाटला/दाटून आलं तेवढंच आणि तसंच त्यांनाही वाटावं अशी माझी अपेक्षा असते आणि इतर जण ती पुरीही करतात. कारण मी कॅथार्सिस करत नाही आणि तेही नाहीत. आम्ही सगळे केवळ डेटाबेस आहोत. आम्ही हसतो,रडतो, नाचतो, भरुन येतो आणि हे सगळं आमच्या मेमरीत साठवुन ठेवतो, पुढच्या खेपेसाठी रेफेरन्स म्हणून.'

................................................................................................................................................................


 

Tuesday, 15 May 2012

Random at my 'REICHSTAG'

when a madman gets hungry
he chews his poetry
and you say ,you chewed his wings
that's what is called a humble kiss
by you to your unknown self

........................................................................................

generally our self is like a big dam, that nothing can pass through, except our needs.

.........................................................................................

मी जितकं जगु पहातोय आणि मुख्य म्हणजे भोगू पहातोय.....रात्र तितकीच उरत जातेय!!

.........................................................................................

marching song of bizarre hopes
shooting moon, bathing corpse
feed with love, the pious worms
priest oh priest,confess wounds

 .......................................................................................

destroy your nucleus and distribute among all....quench their thirst...and quench ur's with their thirst!! yes, here ...i have it all with me, myself...here take it...have YOURSELF..smell it...lick it and throw it in the space....it will keep wandering for years in the galaxies, full of mortal blood space just like your sin shaded with ur needs...don't worry abt me...once i tried to quench my thirst & i had hallucinations of love....i hid them in one of my triangular pockets...sometimes, it beats!! - FROM THE POCKETS OF DAVID MULLAH

.........................................................................................

when they hung peter upside down the cross, he became saint. But if we remove the brick,where will vitthal go?may be into asylum,to find his self, to reincarnate truly. 29th yug will bring him unemployment,so do to our devotion. but 1st We need to loose this brick somewhere.
       religion  it starts with something else and end up in symbols..perhaps a shorter version of amorphous slavery.
        funny thing is we still call Hinduism, a religion..its not a single poem too. Full of weird and completely diff extracts of many. Anything ancient here becomes sacred or so called adhyatma,anyone with turban and saffron robe becomes a guru. If its a proper single religion, then where is the Hindu black mass.the totality removed filth and shame out of it and made it a boring poem.
           in other words we all cant be either liberal or talibanist. Or by other possibility we both live along with each other. The problem is, there is less chance to generate Hindu protestants as a big mass or a kind of counter culture. There is utter confusion about what to follow as well as what to protest. So there is a lot of chance to interpret ahimsa,saty etc the way you want. The Jainism and Buddhism were derived from Hinduism in lot of context which give u a chance to a criticism without confusion(if u want to)
             as Orwell says its a dis utopia. Everybody is lying with each other thinking that they are fooling everybody without getting fooled.
When people start to love their shackles, no change is possible. Status-quo is maintained to maintain this love affair. If we ask who established protestant sect in Christianity? We don't have a single name, its a work of many. But here if someone comes with such idea, they will make him god,build his temples and start to worship him. Buddha was a Hindu protestant. Now he lives in idols without his panchshil.
 

Thursday, 15 March 2012

रख्स-ए-बिस्मिल

या शहरात,
इंद्रियांची भूमिका
विस्तारते क्षणोक्षणी.
देह शिणत नाही.
पण, जीव शिणतो नेमाने.

इथेही आहेत
वारुळांचे चक्रव्युह,
सनातन वेदनांचे
अमानुष पर्याय,
गिधाडं-प्रेतांच्या
बेगुमान वस्त्या,
सावलीला दिवस
आणि
करुणेला रात्र.

इथे
काळोखाच्या ओठांतून,
बर्फाळ प्रार्थनाही
वाहत जातात,
अवरोधाच्या उगमाकडे.
भळाभळा अस्तित्व सांडत
गर्दी जगत रहाते,
होकार नकारांमध्ये
अडकलेल्या
ऐतिहासिक आवृत्त्या...


इथल्या किंकाळीतच,
नग्न आत्म्याचा देह
वस्रांसकट जन्म घेतो.
भयमग्न आवेगात
देह नग्न होतो.
आत्मा वस्र घेतो...

या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
आणि मी असतो,
काळोख जगणारया शरीरात,
भूकेच्या टोलांवर,
जीवाला झोके देत.
सर्वांसह, स्वतःच्या
खुनाचे निर्विकार
कट रचत.

मनातल्या मनात मात्र,
पलिकडचे डोळे
खुणावून सांगतात,
'हे संदर्भ मिटले जावेत.
ही नियती पुसली जावी.
मौनाची रौद्र गाज
रक्तातून कानी यावी.
पैलु पाडलेल्या मुठींना
शुळांचे कोंभ फुटावे.
बंद देहाच्या अवयवांनी
दार मोकळे करावे.
माझाही व्हावा सर्वनाश
माझ्याशिवाय.'

तेव्हा शुभ्र शांततेच्या
एकांतात खुंट तोडुन,
बेहोष वेदनेत मी
सुगंध नाचवत नेईन,
क्षितिजाच्या पारावर
जिवंत होईल,
रख्स-ए-बिस्मिल!

Monday, 5 March 2012

Le Artiste

They act blind.
They believe wind.
and write their letters, with empty minds.
prose and verses,
some fearful curses.
a faithful empathy
by an cruel child.

why in the end
you always bend?
to juggle your trinity
in your tuxedo gent.
while writing p.s.
will you watch in mirrors?
while crying for lovers
have you lost your tears?
here i come folks.
here i come.
i talk to the stone
in my hands.
make my pain march
on beats of my heart.
my breath is nuisance
to your statue filled graves.

still for you folks,
i will roar like a lion.
i will jump like a monkey.
i will act beggar, monk, priest or just
you and me
even i will dress like a woman
and dance for you,
to quench your thirst.
with love and hate
I'll make you burst.
you will clap,
you will laugh.
'Le artiste! Le artiste!'
and throw bread and coins
maybe your sour fucked up minds
but I'll kick it ahead
'Am i an ARTIST? No, I'm just hungry.
Hungry to believe!'

Saturday, 3 March 2012

विराम

भर दुपारी
भुक लेऊन,
अस्ताव्यस्त
केसांनी,
धुरकटलेला
जीव घेऊन,
भारावलेले
क्षण चाळवीत,
तुझ्या दाराशी
छिनालपणे,
उभा जन्म
कोसळण्याची
वाट पाहत?

ते सर्व - २

सर्वांगी,
मौनाचे अधर.
मातीचा पदर.
व्याकूळ नदी
मेघाळलेली.
रेष प्रवाही
चुरगाळलेली.

आज तो येईल.
बाळस्पर्श देईल.
शरिरापलिकडले
स्पर्श ही घेईल.
वादळ ठेऊन,
निघून जाईल.

तो नसतो तेव्हा,
धुगधुगी असते.
पंखही असतात.
पण ओलेत्या
पावलांमधला
आक्रोश अडतो,
मावळतीच्या
घरामागे.

त्यांत,
गर्भपातासाठी विरामलेल्या,
प्राक्तनाच्या अनुयायांनी काढलेल्या,
हजारो
कावळ्या,
डुक्करं,
माश्यांच्या,
मिरवणुकीखाली
शिणतोय,
एक गल्लाभरु देह.

Monday, 27 February 2012

गुडलक कॅफे

मी,
ती,
कॉफी,
सिगरेट्स
आणि
गुडलकच्या
गल्ल्यामागच्या
फोटोतून,
मोनालिसा सारखं
हसणारा पारशीबाबा.
इतकं पुरेसं
नाहीये का?
तंद्रीचे अभंग
श्वास घ्यायला?
स्वत:चा
निरोप घेऊन,
इथेच मी
डोळे मिटतोय

सावलीची कथा

मनाच्या अमर्याद
भिंतींमागे
आपण उभे आहोत.
इथुन पलिकडुनच,
आपण एकमेकांशी
बोलतोय नी
स्पर्श करतोय
एकमेकांना

तू बोलत का नाहीस?
तू आहेस का
पलिकडे?
फक्त तुझी सावली हालतेय.
कधीतरी कोणी येऊन
घेऊन जाणार तुला
पलिकडच्या
क्षितिजाकडे
मग मी असाच
एकटा बडबडत राहीन
तुझ्या सावलीशी..........

व्हर्जीन मुलीचं गाणं - १

ग्रीष्मबंधनाचा देह
त्याला मृत्युची चाहूल
वेड्या जन्माचे कोणते
पडे मनस्वी पाऊल

ढग शोधणारया मुली
उठे दुष्काळात गाव
तुझ्या निजल्या डोळ्यांची
जाते रंगांकडे धाव

लेडी मॅकबेथ

मॅकबेथ
तुझी संदिग्धता सूर देतेय
माझ्या स्वराला.
तुझ्या घराचे वासे
अध आहेत.
तेही नेमाने
ढासळत चाललेत
प्रारब्धाला अंतरल्यासारखे.

लेडी मॅकबेथच्या
काळजात दडलेल्या
एका विशाल पोकळीवर
तू लोंबकळतो आहेस.
आणि
तुझ्या दु:खाशी मी!
टिप टिप गळणार्‍या
वेदनेनं भांबावलीये
माझी संवेदना.

आशेची आंधळी किनार
घेऊन तु धडपडतोयस
माकडीणीच्या पिलागत,
गच्च धरुन,
तुझ्या भूतकाळाला.
आणि तुझे हात?
ते नाहीयेत तिथं
केवळ लेडी मॅकबेथच्या
रक्ताळलेल्या हातांशिवाय......




Sunday, 26 February 2012

जिप्सीज : 1

गात्रधूंद मद लेवून
भयशून्य जिप्सीज
नाचताहेत
खुणावताहेत मला
माझ्या वेदनेसकट

तरी इतक्या सहजी
अथकपणातून मुक्ती
नाहीये
पण नवे पर्याय आहेत

इथे स्बत:च विच्छेदन
करुन
मी मन वेगळं करतो
मग वेदना
आकांक्शा
प्रेम श्रद्धा
कृतार्थता वगैरे

या तुकड्यांकडे
पहातोय मी
तिरहाईत नजरेनं
तेव्हा जाणवतं
आरशात आपल्याला
जसा दिसतो तसा
नसतो आपला चेहरा
भूतकाळाचे भयअश्व
खिंकाळत स्वार होतात
वर्तमानावर
आणि भविष्यात जाणारया
त्यांच्या नालबंद पाऊलवेलीवर
आपण चालतोय
निर्बुद्धपणे
त्या चिरंतन भयाशी
तडजोडी करत

आणि माझ्या
दिशाहीन आयुष्याच्या
वर्तुळाची टोकं
भगव्या क्शितिजाशी
संपत नाहीयेत
मी पिकत चाललोय
या सगळ्या
खरया खोट्या अवयवांसकट

डोळ्यापलिकडले
भास नाकारुन
मी माझं सगळं
जमा करतो आणि
हारीने मांडून ठेवतो
जिप्सी शेकोटीपूढे
आणि नाचतो
गातो
प्रेम करतो
मग जेव्हा त्यांचे
हसरे डोळे
मला स्पर्श करतात
मी पूढे करतो
माझ्या वेदनेचा
रिकामी प्याला

Saturday, 25 February 2012

प्राण

दुरस्थ कंदिलप्रकाशात
चालतोय आपण.
अंधार काजळीचं विश्वरुप
विद्ध करणारया,
प्रकाशकिरणाचं बोट पकडून.

दुतर्फा उभ्या पसरलेल्या,
आरशांच्या भिंतींतुन,
थरारताहेत आपल्या
भयाण, निश्चल
सावल्यांची प्रतिबिंबं.

त्या मानवीय नाहीत.
त्यांना पाय नाहीत.
त्या नीरव शोकावर्तात
कालबद्ध आहेत.

त्यांची काजळी
लावून घेऊ
आपल्या व्रणांना.
त्याने आपण एक होऊ?
निदान आपली प्रारब्धं?

आपण एकमेकांचे कोण?
ते माहित नाही.
तरी इथे नजरेत दिसतोय
तुझ्या अभावांना माझा चेहरा
नी माझ्या अभावांना तुझा.
तुच आहेस माझी पायवाट
म्हणून सांगतो,
या कंदिलापलिकडे आपण
अनादि नसु.
पण कंदिलच आहे आपल्या
ब्रम्हाची सीमा.
मर्यादेच्या काठावरुन
कलंडणारी अमर्यादा!

तसं आपणा दोघांनाही आहे,
त्या पुरातन शापाचं वरदान.
नी आपण समिधा आहोत.
आपण आर्त आहोत.
आणि आपण चालतोय.

Thursday, 23 February 2012

मुक्तीद्वार

भगव्या देहाचे मुक्तीद्वार
पाठीवर घेऊन
तो चढत जातो
पहाडी वाट
जाणिव नेणिवेच्या
अनुभुतीची बीजं
विखरुन देत वाटेवर
जात पंथ
धर्म वर्ण
रंग लिंगांतुन
मुक्त होण्यासाठी
स्वताला निर्विकाराने
भारण्यासाठी

पहाडाच्या टोकावर
तो वाट पहातो
मुक्तीद्वार उघडण्याची
बघ मी समाजमितीच्या
सगळ्या संकल्पना
सोडुन आलोय
आदिम होऊन आलोय

तरी ते उघडत नाही
मग देतो ढकलुन
निमिषार्धात
पहाडाच्या टोकावरुन
गडगडत
धडधडत
ते पायथ्याशी येतं

तितक्यात कुठुनसं
भयशुन्य फुलपाखराचं
अस्तित्व लहरत येतं
आणि त्यामागे
कुतुहलाचे पाय घेऊन
एक लुतभरलं कुत्रं
स्वताचं आत्मभान
द्विधा करणारी
खाज विसरुन
वेड्यासारखं झेप घेतं

तडजोडीचं नेमकेपण
नाकारणारी
अंतप्रेरणेची मुळं
आवेगानं दार उघडतात
नी दोघांना सामावून
घेतात
आणि तिथल्या तिथे
ध्यानस्थ ऋषीच्या
डोळ्यांसारखं
दार शांतपणे मिटतं

तो पाहतो उंचावरनं
स्वानुभुतीच्या
व्युहरचनेतनं
स्वयंभु अभावांची
तिरीप येते
आत्मा शरीर मन
चाचपून घेते

तो खाली उतरतो
शांतपणे
मंदपणे
हसत हसत
श्राप भोगत
सिसिफसत

माणसाळलेला माणूस

माणसाळलेला माणूस
नाक्यावरती उभा असतो.
समाज न्याहाळत,
भूक चघळत
थंडपणे श्वास घेतो.

हातात हात घालुन,
फुलं माळलेली
कपल्स येतात.
एकमेकांना किस करत,
धुंद होत निघुन जातात.
तो कोल्डपणे म्हणतो
"सो कूल"
आणि पडलेलं फूल
खिशात ठेवतो.

तसं सहसा चिंतनमुक्त
जगत नसतं कुणीच
त्यात कधीकधी
संपृक्त शरीरावर
अतृप्त विचारांची
बांडगुळं चढतात,
तेव्हा तो स्वताशीच
खदाखदा हसतो.
'ऐला भारीच' म्हणत
विचारांची पिंक टाकतो
की पिंक त्याला टाकते?
सगळा हिशेब एकच!

मिरवणुकीमागे चालत जातो.
अर्धातास भाषणं ऐकतो.
नंतर स्वत:शीच वैतागून म्हणतो,
'आदिवास्यालाही
आध्यात्मिक फिल करुन देईल,
तोच खरा धर्म!'
मग मनातल्या मनात
थुंकून तो चालु लागतो.
समाजाकडुन समाजाकडे....

तशात संध्याकाळ होते.
ढगाळून येतं.
भुकेल्या पोटाला
शहाणं मन काहिसं
गोंजारुन घेतं.
तो निर्विकारपणे
त्यांच्यात मिसळतो.
सगळी गर्दी अंगावर घेतो.

भयभीत झुलत्या पुलावरुन,
शुन्य ओढत गर्दी जाते.
जगण्या मरण्याच्या
तथाकथित संदर्भाँकडे.
कुणीच काही बोलत नाही.
तरी काहीच टळत नाही.
शांतपणे जळत रहातात,
रस्त्यावरचे दिवे....

Monday, 6 February 2012

अशांत वारा

'तुमचं जगणं नामंजुर केलंय!'
अशा आशयाचे खलिते येतात.
त्यातली उद्विग्न शाई,
धुमसताना दिसते.
ती तो पिळुन घेतो.
जखमांवरचे मलम म्हणुन.

वेदनेचे काय?
आजची जगुन झाली
तरी उद्याची जगायची असतेच.
त्यामुळे त्याला किंचितही
भिती वाटत नाही दुःस्वप्नांची

पायाखाली माझी माती आहे.
अन छातीमध्ये सुर्य आहे.
मग चिरंतन वाटेवरचे अनेक हात,
सोबतीला येतील प्रकाशाकडे.

चालता चालता रात्र होते
हाडांना आरपार चिरणारी
कडाक्याची थंडी...
तो झोपतो.
फुटपाथवर
गटाराच्या कडेला
स्ट्रीटलाईटखाली.

तेव्हा ते माग काढत येतात.
संगिनीच्या टोकावर डकवलेलं,
उदारमतवादी घोंगडं
त्याच्याकडे सरकवतात.
त्याच्या हजारो छिद्रातुन,
अंधुकसा प्रकाश गळत असतो.
'हा भुमिगताला पुरणार नाही!'
तो शांतपणे उद्गारतो.

मग पुन्हा खलिते येतात.
नामंजुरीचेच.
त्यावर कुणाचं तरी रक्त असतं.
बेड्या, वधस्तंभ असतात.
पाहुन, लहान मुलासारखं
तो कोवळं हसतो.
आणि उत्तर लिहायला बसतो.
'प्रस्थापितांनो,
ह्र्दयात जोवर निखारे आहेत
आणि आहेत अशांत वारे
तेथपर्यंत खोल रुतत-रुजत राह्तील,
क्रुसावरचे खिळे.
भेटुच आपण पुन्हा.
वस्त्यांत
पोलिसचौक्यांत
आणि रस्त्यांवर....
ता.क.: मी तुम्हालाच नामंजुर करतोय.

Friday, 3 February 2012

तुटलेल्या मैत्रीणीस :२

 तुटलेल्या मैत्रीणीस,

आपण एकमेकांवर प्रेम करता करता,
एकेक दरवाजे बंद करत गेलो.
नवे न उघडता.
अंर्तभागात जसे हलतात सूर,
तशाच विस्कळीत होत चालल्यात
आपल्या वेदना.

त्यालाही आता पर्याय नाहीये.
आपल्यात लपलेला एक खाटिक होता.
तुकड्या तुकड्यात जगणारा.
स्पर्शाचं शिवार मावळे पर्यंत,
त्वचा सोलुन ,
आपली शरिरं आंधळी केली त्यानं.

नंतर आपण एकमेकांच्या
प्रेतयात्रेतही सामील झालो.
झिंगलो,
रडलो,
नाचलो....सर्व काही

पण आता तुझा कंटाळा येतोय.
ओलाव्याची माती गळुन पडतेय,
फुलांसकट
चिरंतन तेवणारया डोळ्यांना,
सारखं वाटतंय की काहीतरी
भयंकर चाल करुन येणार आहे.
पण जिव्हारी लागलेला काळोख
मला हलवुन हलवुन जागं करतो
आणि माझेच शब्द माझ्याकडे पाहुन
खदाखदा हसत सुटतात.
दबक्या आवाजात बजावत रहातात
'तु माणुस म्हणुन जगतोयस
आणि माणुस म्हणुनच उरणार आहेस.'

म्हणुन आता उचल त्या ओळी,
आणि भिरकावुन दे माझी कविता.
त्याबदल्यात,
मी तुला तुझं जगणं परत करतो.
तुझ्या काजळभरल्या डोळ्यांसकट.
मग आपण एकमेकांकडे पाठ करु
आणि खोल अंधारात निघुन जाऊ.
आधीच आपण भिन्न होतो.
आता आपण शुन्य होऊ.

मग अशाच कुठल्यातरी,
एखाद्या रानाच्या अंर्तभागात
भयाण दुःखासारखं ,
निपचित पहुडलेलं तळं असेल
त्यात थेंब थेंब शुन्यपणे,
गळत असेल काळसर निळाई,
नक्षत्रफुलांच्या सावलीवर.
निमुट एकटी होडी असेल,
डुचमळत हेलकावे खात
चंद्राच्या निर्विकार देहासह,
तरंग उठतील,
नक्षत्र थरारेल,
आणि हलकेच त्या निळाईत
विरुन जातील, मंदपणे.
शेवटच्या श्वासाची
माझी वैराण स्पंदने......
                       - हरवलेल्या जहाजाचा कप्तान

Sunday, 29 January 2012

काळ, मन आणि वेग


भुतकाळाचा मागोवा घेत
इतिहास खोदत बसणारे
बनुन जातात अश्वत्थामा
नवनिर्मीतीचा आत्मा त्यागुन गेलेलं
जखमी कलेवर......
त्यांचा श्वास अनुबद्ध असतो
आपल्या मारेकरयाशी,
जखम देणारयाशी.

जगता जगता,
अनेकदा आभास होतो.
आणि दिसतात,
भविष्याकडे जाणारया
आपल्याच पावलांच्या
रक्ताळलेल्या पाऊलखुणा
वाटते, सारे काही इथेच संपावे
असेच वर्तमानात.
निसटुन जावे सगळे स्वतःचे..
वाहुन जावे सारे जमवलेले..
स्वतःसकट नी स्वतःशिवाय!

भीतीची अनोळखी स्पंदनं
शांत पावलांनी येतात
जीवनाच्या, भावनांच्या
पुंजांमध्ये शोधत रहातात,
निषिद्ध अंधार.....

मात्र आम्ही वर्तमानात
जगतो?!
नव्हे केवळ  असतो.
वर्तमानात असते ती
केवळ भूक!
शाश्वत आणि चिरंतन! 
                            (yet to complete this poem.)

Tuesday, 24 January 2012

दोन प्रयास

शरीराची वावटळ काही मिन्टांची
मनाची वादळं काही अंशाची !
उत्तर चुकेल,
तिढा हुकेल,
प्रकाशाचा पदर ढळेल!

दुःखाची फुले वेचुन घेऊ
नी सुखाचं निर्माल्य होऊ
ये, पुर्णांशाने नग्न होऊ
नी पहाडावरुन जीव देऊ

Sunday, 15 January 2012

ते सर्व

बांधावरती उभे रहातात  एकमेकांना खेटुन
ते सर्व!
त्यांचं त्यांनाच कळत नाही
हळुहळु ते स्वतःच होऊन जातात बांध.
मनातला किंवा  मनाबाहेरचा अंधार
थोपवत रहातात, उद्याच्या आशेने
पण एकमेकांना खेटुन,डोळे गच्च मिटुन
आणि लाटेकडे पाठ फिरवुन
प्रश्न सुटत नसतात.
मग अंधारपोकळीचं अवकाश होतं.
शरिरं भरडतात,
मनं उध्वस्त होतात.
रक्त, हिंसा आणि आरोळ्यानी
सारं काही भरलेलं असताना,
अन्यायी राजा नी शुर प्रजा
गोष्टीमधुन फक्त हसतात.

दंगलीत मेलेल्या कुणाचं तरी शव
असंच पडुन रहातं मार्गात.
कोल्हेकुत्रांच्या भयासकट
नगर ध्वस्त होत रहातात.
त्या सर्वांसकट नी जिवंत प्रेतांशिवाय!
मग ते सारे जमतात सुद्न्यपणे
काही झालंच नाही अशा मनाने.
वाळवी उखडुन टाकली जाते,
अंधार लिहीला जातो,
मिटवला जातो
प्रश्नांसकट
व्रणांसकट
पण नुसतं लिहुन अंधार संपतच नाही
अंधार संपण्यासाठी नसतोच मुळी
बांध मात्र तुटण्यासाठी बनवले जातायत
शतकानुशतकें.....




नियती

गर्दीत लहान मुलासारखं
शरिर हरवुन बसतं कधीतरी
सैरभैर, प्रश्नांकित
आणि मनाला आपण हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....

पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत मूकपणे
चालत रहाते.

तिच्यात सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात

भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
शवपेटीत बंद.

चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा